विजयी नगरसेवक

विजय दिवस - 16/01/2026

निकालाच्या दिवशी गुलालात साजरा झालेला आनंद, आणि कार्यकर्ते, माता-भगिनींकडून मिळालेले आशीर्वाद हीच माझ्या पुढील प्रत्येक निर्णयामागची खरी ऊर्जा आहे. या बळावर, प्रभागातील प्रत्येक प्रश्नासाठी लढत राहणे, प्रत्येक समस्येवर ठोस उपाय करणे आणि विकासाला गती देणे — यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. जनतेचा विश्वास हीच माझी ताकद — विकास हीच माझी दिशा. प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि आधुनिक थेरगाव घडवण्याचा आमचा ठाम संकल्प.

प्रभाग क्रमांक 24 मधील सर्व मतदार व नागरिकांचे मनःपूर्वक आभार. माझ्यावर विश्वास दाखवून मला नगरसेवक पदी विराजमान होण्याची संधी दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. हा विजय केवळ माझा नसून, माझ्यासोबत उभे राहिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, माता-भगिनींच्या आशीर्वादांचा आणि जनतेच्या प्रेमाचा आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर गुलालात साजरा झालेला हा आनंद, आणि मिळालेले आशीर्वाद— पुढील वाटचालीत मला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देतील. प्रभागातील सर्वांगीण विकास, नागरिकांच्या समस्या आणि विश्वासाला न्याय देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन, ही ग्वाही देतो. तमाम थेरगाव वासियांचे, शिवसैनिक व समर्थकांचे मनःपूर्वक आभार.

प्रभाग क्रमांक 24 मध्ये शिवसेनेचा शानदार विजय! 🚩 थेरगावच्या जनतेने शिवधनुष्याला स्पष्ट कौल देत विश्वजीत बारणे आणि निलेश बारणे यांना भरघोस मतांनी विजयी केले. पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून दोघेही विराजमान झाले, हा क्षण प्रत्येक शिवसैनिकासाठी अभिमानाचा आहे. येणाऱ्या काळात प्रभागातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी, जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी दोघेही निष्ठेने, कार्यतत्परतेने आणि प्रामाणिकपणे काम करतील, असा ठाम विश्वास आहे. हा विजय म्हणजे निवडणूक काळात दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या शिवसैनिकांच्या परिश्रमांचा सन्मान आहे. शिवसेनेचे जनतेशी असलेले नाते असेच अधिक दृढ होत राहो! जय महाराष्ट्र 🚩

मतदान दिवस

प्रचार दौरे

शिवसेनेचा विजयाचा संकल्प! आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा पुणे जिल्हा शिवसेना संपर्क मंत्री ना. श्री. उदयजी सामंत साहेब व माझ्या उपस्थितीत शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी सामंत साहेबांनी निवडणुकीच्या रणनीतीबाबत मोलाचे मार्गदर्शन करत, सर्व जागांवर विजयाचा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी मी देखील सर्व उमेदवारांशी संवाद साधून, ‘प्रत्येक शिवसैनिकाने जनसेवेचा वसा घेऊन प्रभागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचावे’ असे आवाहन केले. तसेच, विकासकामांच्या जोरावर आणि पक्ष संघटनेच्या मजबुतीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भगवा फडकवणे हेच आमचे मुख्य ध्येय असल्याचे अधोरेखित केले. या बैठकीस माझ्या समवेत शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने निष्ठावान शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसैनिकांचा निर्धार, विजयाचा हुंकार! आज वाकड येथील ‘हॉटेल टिपटॉप’ मध्ये महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा पुणे जिल्हा शिवसेना संपर्क मंत्री ना. श्री. उदयजी सामंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस माझ्या समवेत शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद, शिवसेना उपनेत्या सुलभाताई उबाळे, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत दादा बारणे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाऊ खांडभोर, शिवसेना जिल्हा समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख शिलाताई भोंडवे, शिवसेना महानगर प्रमुख राजेश वाबळे, शहर प्रमुख निलेश तरस, युवासेना जिल्हा प्रमुख सागर पाचरणे, मावळ लोकसभा युवासेना अध्यक्ष राजेंद्र तरस, युवतीसेना अध्यक्ष सायलीताई साळवी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

🚩 जनविश्वासाचा ठाम संदेश… परिवर्तनाची स्पष्ट दिशा! 🚩 पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणूक २०२५–२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक २४ मध्ये आज गुजरनगर येथे पार पडलेली कॉर्नर सभा म्हणजे जनतेच्या विश्वासाचा सशक्त प्रत्यय ठरली. शिवसेना उमेदवार विश्वजीत बारणे, निलेश बारणे तसेच शिवसेना पुरस्कृत उमेदवार सौ. रूपाली लालासाहेब गुजर आणि मायाताई संतोष बारणे यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद लाभला. विशेषतः महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती आणि नागरिकांचा ठाम पाठिंबा हे स्पष्ट संकेत देऊन गेला की प्रभाग २४ मध्ये जनतेने विजयाचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. विश्वास, सहभाग आणि अपेक्षांचा हा सूर येणाऱ्या विजयाची शांत पण ठाम चाहूल देतो. 🚩

🚩 जनविश्वासाचा ठाम संदेश… परिवर्तनाची स्पष्ट दिशा! 🚩 पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणूक २०२५–२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक २४ मध्ये आज गुजरनगर येथे पार पडलेली कॉर्नर सभा म्हणजे जनतेच्या विश्वासाचा सशक्त प्रत्यय ठरली. शिवसेना उमेदवार विश्वजीत बारणे, निलेश बारणे तसेच शिवसेना पुरस्कृत उमेदवार सौ. रूपाली लालासाहेब गुजर आणि मायाताई संतोष बारणे यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद लाभला. विशेषतः महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती आणि नागरिकांचा ठाम पाठिंबा हे स्पष्ट संकेत देऊन गेला की प्रभाग २४ मध्ये जनतेने विजयाचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. विश्वास, सहभाग आणि अपेक्षांचा हा सूर येणाऱ्या विजयाची शांत पण ठाम चाहूल देतो. 🚩

शिवसैनिकांचा निर्धार… विजयाचा रणशिंग फुंकला! 🚩 पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर आज किवळे मुकाई चौक येथे झालेली भव्य जाहीर सभा म्हणजे जनविश्वासाचा ठाम प्रत्यय होता. या सभेस शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांनी थेट लाईव्ह मार्गदर्शन केले. तसेच उद्योग मंत्री मा. श्री. उदयजी सामंत यांनीही प्रभावी शब्दांत सभेला संबोधित केले. या रणघोषात उपनेते इरफान सय्यद, सुलभाताई उबाळे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, पश्चिम महाराष्ट्र युवा सेना प्रमुख विश्वजित बारणे, जिल्हा संघटक बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख निलेश तरस, जिल्हा संघटिका शिलाताई भोंडवे, महानगरप्रमुख राजेश वाबळे, रूपेश कदम, सायली साळवे, माऊली जगताप उपस्थित होते. नागरिक, महिला आणि युवांचा उस्फूर्त जनसागराने येणाऱ्या विजयाची चाहूल दिली. ही निवडणूक नाही, हा शिवसेनेचा विजयाचा इतिहास असणार! आता फक्त एकच आवाज शिवसेना! शिवसेना! शिवसेना!

प्रभाग २४ मध्ये आता परिवर्तनाची लाट! आज प्रभागातील जनतेशी जनसंवाद साधून त्यांच्या मनातील अपेक्षा समजून घेतल्या. प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवण्याचे आमचे ध्येय असून, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू.

उमेदवारी अर्ज दाखल

सोशल मीडिया सोशल मीडिया सोशल मीडिया
Chat on WhatsApp