श्रीरंग आप्पा बारणे
Background
माहिती

श्रीरंग आप्पा बारणे

Meeting
Discussion
Rally

एक समर्पित लोकसेवक,
मावळच्या मातीशी जोडलेला.

श्रीरंग आप्पा बारणे यांनी १९९७ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. २०१४ मध्ये त्यांनी १६ व्या लोकसभेत निवडून येऊन राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. २०१९ आणि २०२४ मध्ये ते पुन्हा निवडून आले — मावळमधून सलग तीन वेळा खासदार होण्याचा मान त्यांनी मिळवला.

त्यांनी ऊर्जा, संरक्षण, वित्त, पर्यटन आणि संस्कृती यावरील महत्त्वपूर्ण संसदीय समित्यांवर काम केले आहे. तसेच त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना 'संसद रत्न', 'विशेष संसद रत्न' आणि 'महासंसद रत्न' पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

दृष्टिकोन

पारदर्शक आणि जबाबदार नेतृत्वातून मावळच्या प्रत्येक नागरिकांच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी कटिबद्ध !

ध्येय

पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्याच्या बळावर तरुण, महिला आणि समाजातील शेवटच्या घटकाला सक्षम बनविणे.

राजकीय प्रवास

१९९७ ते २०२६ ची वाटचाल

नगरसेवक ते सलग तीन वेळा खासदार... लोकसेवेचा एक अविरत आणि प्रेरणादायी प्रवास.

1997

नगरसेवक, PCMC

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून सार्वजनिक जीवनाची सुरुवात.

1999

अध्यक्ष, स्थायी समिती

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य.

2007

नगरसेवक, पी. चि. मनपा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत पुन्हा नगरसेवक म्हणून निवड.

2014

१६ व्या लोकसभेवर निवड

मावळ मतदारसंघातून खासदार म्हणून राष्ट्रीय राजकारणात पहिला प्रवेश.

2019

दुसऱ्यांदा खासदार मावळ लोकसभेवर निवड

मावळच्या जनतेच्या भक्कम विश्वासाच्या बळावर दुसऱ्यांदा खासदारपदी निवड; संसदेत दमदार पुनरागमन !

2020

महासंसद रत्न पुरस्कार

विधिमंडळातील सातत्यपूर्ण व उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा विशेष सन्मान आहे.

2024

तिसऱ्यांदा खासदार · १८ वी लोकसभा

मावळमधून सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजयासह निवड.

2025

विशेष संसद रत्न

सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या ओळखीसाठी 'विशेष संसद रत्न' पुरस्कार.