20th Feb 2025
मावळ लोकसभा मतदार संघाचे महासंसदरत्न खासदार श्री श्रीरंग आप्पा बारणे यांचा वाढदिवसानिमित्त युवासेना पुणे जिल्हा समन्वयक श्री. सागर पाचरणे यांनी पुढाकार घेऊन भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले. तरुण पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेल्या या उपक्रमाला युवक-युवतींचा उत्तम प्रतिसाद लाभला.या प्रसंगी शिवसेना उपनेते श्री इरफान भाई सय्यद,पच्छिम महाराष्ट्र सचिव श्री विश्वजीत बारणे,माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे,जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर,शिवसेना महिला जिल्हा संघटिका सौ. शैलाताई पाचपुते, युवासेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप पांढरकर, खंडूशेठ चिंचवडे, शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख निलेश तरस, शिवसेना पिंपरी चिंचवड शहर संघटिका सौ सरिताताई साने,शिलाताई भोंडवे यांसह मोठ्या संख्येने युवक-युवती व पदाधिकारी उपस्थित होते.रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या करण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरो, यशस्वी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!

