
20th Feb 2025
महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक प्रेरणादायी उपक्रम! महासंसदरत्न खासदार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त मॅजिक ऑफ सीझर्स व युवासेना च्या वतीने आयोजित महिलांसाठी स्वयंरोजगार मेळावा हा स्तुत्य उपक्रम आहे. आज मोरया बँक्वेट हॉल, दत्तनगर, थेरगाव येथे या कार्यक्रमास उपस्थित राहून महिलांच्या प्रगतीसाठी घेतल्या जाणाऱ्या पुढाकाराल पाठिंबा दिला. या स्वयंरोजगार मेळाव्याला माझ्या समवेत युवा सेनेचे पच्छिम महाराष्ट्राचे सचिव विश्वजित बारणे,मॅजिक ऑफ सीझर्स संस्थेचे अध्यक्ष श्री मझर जावेद, पिंपरी चिंचवड लोकमत सखी अध्यक्ष सौ. संगीता तरडे,युवसेना जिल्हा समन्वय श्री सागर पाचरणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री दिलीप पांढरकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख सायली साळवे,दंड नायक, पिंपरी चिंचवड लोकमत सखी सदस्य सौ अनुशी वेदपाठक, पूनम पाचरणे, शिल्पाताई पाचरणे, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते. स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या या उपक्रमात सहभागी होणे हा आनंदाचा आणि समाधानाचा क्षण होता!




